बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन!

नवी दिल्ली | एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेते बॉक्सर दिनको सिंह यांचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालं आहे. काही दिवसांपासून सिंग यांच्यावर आयएलबीएस दिल्ली येथे उपचार सुरू होते. 2017 पासून त्यांच्यावर यकृताच्या कर्करोगावर उपचार सुरू होते.

दिनको सिंह यांनी 1998 मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 1998 मध्ये त्यांना अर्जुन आणि 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सिंग यांनी भारतीय नौदलात सेवा केली आणि प्रशिक्षक म्हणूनही काम केलंय.

क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दिनको सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दिनको सिंह यांच्या निधनामुळे अतिशय वाईट वाटत आहे. ते भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट बॉक्सिंगपटूंपैकी एक होतं, असं ट्विट रिजीजूंनी केलंय.

तब्येत बिघडल्यामुळे त्यांना गेल्या वर्षी मणिपूरहून विमानाने दिल्ली येथे आणण्यात आलं होतं. मात्र कावीळ झाल्यामुळे त्यांच्यावर कर्करोगावरील उपचार करता आले नाहीत. त्यानंतर पुन्हा त्यांना रुग्णवाहिकेतून 2400 किमी लांब असलेल्या मणिपूरला नेण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“…त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली असती”

‘नवनीत राणा यांच्यावर लोकसभा सभापतींनी कारवाई करावी’; आनंदराव अडसूळ आक्रमक

नियती काळ बनून आली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा करुण अंत, मालाड दुर्घटनेनं मुंबईच्या डोळ्यात पाणी!

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी!

‘…म्हणून मी कर भरला नाही’; कंगणाने कर न भरण्याचं दिलं ‘हे’ कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More