बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला पुन्हा नजरकैदेत ठेवलंय, मला बाहेर पडू दिलं जात नाही”

नवी दिल्ली | केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम लागू केल्यानंतर त्यावेळी जम्मू काश्मीर मधील अनेक बड्या नेत्यांना नजरकैद ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये अनेक घटना घडल्या. पीडीपी पक्षाच्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारने पुन्हा नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे.

लष्कराने कथितरीत्या तोडफोड केल्यानंतर त्रालमधील एका कुटंबाला भेट देण्यासाठी मी जात होते. मात्र, लष्कराने मला घराबाहेर पडू दिलं नाही. बाहेर पडण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर आज पुन्हा माझ्या घरात बंद आहे. हे काश्मीरचे खरे चित्र आहे. भारत सरकारने स्वच्छ आणि ठरलेल्या पिकनिक दौऱ्यांऐवजी हे दाखवायला हवं, असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. या अगोदर 7 सप्टेंबर रोजी देखील नजरकैदेत ठेवल्याचा दावा मुफ्ती यांनी केला होता.

केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांच्या हक्कांविषयी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, त्याचवेळी जाणूनबुजून काश्मीरमधील जनतेला मात्र हे हक्क नाकारले आहेत, असा आरोप देखील मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

दरम्यान, जम्मू- काश्मीर विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली होती. जम्मू काश्मीरला घटनेतील 370 व्या कलमानुसार विशेष दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर आता येत्या काळात जम्मू कश्मीरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

“पोकळ शब्दांची नाही तर, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज”

“पक्षाला अध्यक्षच नाही मग निर्णय कोण घेतंय?, आता किती दिवस थांबायचं?”

मराठवाड्यात अतिवृष्टीनं हाहाकार! 436 नागरिकांचा मृत्यू; मुख्यमंत्री ठाकरे करणार पाहणी दौरा

“लायकीत राहा अन् दम असेल तर समोर या, शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ”

तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल तर… – राहुल गांधी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More