“आलोक वर्मांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा नाही, त्यांना हटवण्याचा निर्णय घाईगडबडीचा”

नवी दिल्ली | नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला, असं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए के पटनायक यांनी म्हटलं आहे.

आलोक वर्मा यांची सीवीसीकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीवर देखरेख करण्याची जबाबदारी ए के पटनाईक यांच्यावर सोपवण्यात आली होती.

सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा सापडला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निवड समितीने वर्मा यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-

-“जे 60 वर्षात झालं नाही ते गेल्या साडे चार वर्षात झालं”

-दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पुण्याचे मेजर शशीधरन नायर शहीद

-शिवसेनेनं मागणी तर करावी त्यांना काय हवं आहे- रावसाहेब दानवे

-“आम्ही जे वायदे केले होते ते आम्ही पूर्ण केले, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय”

-भाजपच्या युथ ब्रिगेडचा नवा नारा ‘मोदी अगेन’