बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केवळ मोदी लाटेच्या जीवावर निवडणुका जिंकू शकत नाही कारण…”; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य!

नवी दिल्ली |  आगामी काही काळात विविध राज्यात विधानसभासाठी निवडणुका होत आहे. त्यासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. 2014 साली केंद्रात भाजपने सत्ता मिळवली त्यानंतर 2019 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता हस्तगत केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी मोदी लाटेवर वक्तव्य केलंय.

नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर अनेक राज्यात भाजपने विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. केवळ मोदी लाटेच्या जीवावर कर्नाटक विधानसभा निवडणुका जिंकू शकत नाही. लोकसभा निवडणुकीत परिस्थीती वेगळी असते आणि राज्यातल्या निवडणुकांमधील स्थिती वेगळी आहे.  त्यामुळे आपण मोदी लाटेवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे आपल्याला विकासकामे घेऊन लोकांपर्यत जायला हवं, असं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी.एस येडियुरप्पा यांनी सांगितलं आहे.

कर्नाटक राज्यातल्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यात काय संदेश जाईल त्याची कल्पना आहे. या निवडणुका जिंकणं सोप्या जातील असं समजू नका. त्यासाठी विरोधक सक्षम आहेत. त्यांची काही गणितं आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं, असंही येडियुरप्पा म्हणाले,

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीनंतरही केंद्रात भाजपची सत्ता राहणार आहे. यात काहीच शंका नाही आहे. परंतु प्रत्येक निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी आपण पक्षाला मजबुत करायला हवं, असंही येडियुरप्पा यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ 12 राज्यांनी देशाचं टेंशन वाढवलं; कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ

बाप बापच असतो… बिबट्याच्या जबड्यातून केली मुलाची सुटका

“ज्याच्या घराला कधी छत नव्हतं, त्याला आज काॅंग्रेसने मुख्यमंत्री बनवलंय”

सासू सासऱ्यांना आला सूनेवर संशय, नात्वाचा जन्म होताच केली DNA टेस्ट अन्…

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More