मोठी बातमी! आणखी एका बड्या नेत्याच्या गाडीला अपघात
मुंबई | महाराष्ट्रातील नेत्यांचे अपघात (accident) कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. थोड्या थोड्या अंतराने कोणत्यातरी नेत्याचा अपघात होत आहे. अशातच पुन्हा एकदा एका माजी मंत्र्याचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी, शिंदे गट झाल्यानंतर आता शिवसेनेतील बड्या नेत्याचा अपघात झाला आहे.
घोडबंदरवरुन पालघरला जात असताना माजी मंत्री दीपक सावंत यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या कारला मागून डंपरने धडक दिली आहे. या कार अपघातात ते जखमी झाले असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पालघर येथील कुपोषित मुलांच्या झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यासाठी गेले होते. यावेळी साकीनाका येथे त्यांच्या कारला मागून एका डंपरने जोरदार धडक दिली. यामध्ये सावंत जखमी झाले आहे. त्यांच्या डोक्याला आणि कपाळाला मार लागला आहे.
या अपघातात त्यांच्या गाडीला मागून जोरदार धडक बसली आहे. अपघात झाल्यानंतर सावंत स्वत:च रुग्णवाहिकेने हाॅस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलं आहे.
महाराष्ट्रात गेले काही दिवस नेत्यांच्या अपघाताची मालिका सुरुच आहे. भाजप नेते जयकुमार गोरे, राष्ट्रवादीते नेते धनंजय मुंडे, शिंदे गटाचे नेते योगेश कदम याच्यादेखील गाड्याचा अपघात झाले आहेत. सुदैवानं यामध्ये कोणालाही प्राण गमवावे लागले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.