बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला, पण पावसाला काय माहिती साहेब फक्त…”

मुंबई | माजी राज्यमंत्री सदाभाऊ (Ex Minister Sadabhau Khot) खोत नेहमीच महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येतात. मात्र, यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावरच निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीवरून सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

त्यांनी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्विट केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला. पण पावसाला तरी कुठे माहित आहे. साहेब फक्त निवडणुकीचा काळ असतानाचं पावसात भिजतात. बाकी वेळेस साहेंबाकडे छत्री उपलब्ध असते, असा टोला त्यांनी पवारांना लगावला आहे.

ममता बॅनर्जी यांनी मुंबईत शरद पवारांची घेतलेली भेट विशेष चर्चेत राहिली होती. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली होती. यावरून विरोधकांनी महाविकास आघाडीसोबतच शरद पवारांवरही टीका केली होती. ममता बॅनर्जी आणि शरद पवारांच्या भेटीमागे राजकीय षडयंत्र शिजत असल्याची टीका विरोधकांनी केली होती.

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. या सभेला शरद पवाराचं भाषणादरम्यान जोरदार पाऊस सुरु झाला होता. तरीही पवारांनी भर पावसात भिजत छत्री न घेता त्याचं भाषण पूर्ण केलं होतं. यावरून पवारांच विशेष कौतुक तर झालचं मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार येण्यामागे हिचं सभा कारणीभूत असल्याचंही बोललं जातं.

पाहा ट्विट-

थो़डक्यात बातम्या-

शिवसेनेची नेमकी भूमिका काय? तिसऱ्या आघाडीबाबत स्पष्टच सांगितलं…

PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; आता मुख्य परीक्षा ‘या’ तारखेला होणार

बुस्टर डोसची गरज आहे का?, असेल तर कोणती लस घ्यावी?; तज्ज्ञ म्हणतात…

रोहित पवारांना मंत्रिपद मिळणार का?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“लड़ोगे नहीं तो जीताेगे कैसे?”, प्रियंका गांधींचा पारा चढला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More