बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला धक्का; माजी मंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत!

नागपूर | भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे माजी अर्थराज्यमंत्री आणि भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत असलयाचं बोललं जात आहे.

येत्या 19 जून रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं निमित्त साधून मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात देशमुख पक्षप्रवेश करणार आहेत. काँग्रेस हायकमांडनेही या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दिला आहे. सुनील देशमुख हे विदर्भातील मोठे नेते आहेत.

देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने विदर्भात ताकद वाढवण्यात काँग्रेसला बळ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुनील देशमुख हे काँग्रेसच्या तिकीटावर अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने विदर्भात भाजपला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्याचे सुतोवाच केलं आहे. स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

आयटीचं बँड वाजणार, 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

शिवसेनेनं आता सामना बंद करून बाबरनामा काढावा- अतुल भातखळकर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आधी सचिनने भारतीय संघाला दिल्या ‘या’ खास टिप्स

“काँग्रेस पक्ष म्हणजे टायटॅनिकचं जहाज, तो बुडतच चाललाय”

‘महाराष्ट्रात पुढील एक-दोन महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते’; आरोग्य विभागाचा इशारा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More