महाराष्ट्र मुंबई

“राजू शेट्टीचा आता काजू शेट्टी झालाय; शेतकऱ्यानं सोडलेला रेडा दिसेल त्या पिकात तोंड घालतोय”

मुंबई | दूध दरवाढीच्या मुद्यावरून आज राज्यभरात भाजपकडून आंदोलन सुरू आहे. या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या दोघांमध्ये जुंपली आहे. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाल्याची जहरी टीका खोत यांनी केली आहे.

राजू शेट्टी भ्रमिष्ट झाल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरसंधान साधलं. राजू शेट्टी भंपक माणूस आहे. राजू शेट्टीचा आता काजू शेट्टी झाला आहे. हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला आहे. प्रत्येक गावात देवाच्या नावानं एक वळू-रेडा सोडलेला असतो. तसा हा रेडा आहे. त्याला शेतकऱ्यांनी सोडून दिलंय. हा रेडा आता दिसेल त्या पिकात तोंड घालू लागला आहे, अशा शब्दांमध्ये खोत यांनी शेट्टींवर घणाघाती टीका केली आहे.

सदाभाऊ खोत दोन वेळा खासदार करायला त्या रेड्याबरोबर होता. तेव्हा दोन्ही हातांनी सदाभाऊचा गजर सुरू होता. तेव्हा सदाभाऊ चालत होता. पण आता त्यांना सत्ता मिळाली नाही, केंद्रात मंत्रिपदही मिळालं नाही. पण त्यांच्या सहकाऱ्याला मंत्रिपद मिळालं. त्यामुळे लगेच पोटात गोळा आला, अशा शब्दांत खोत यांनी राजू शेट्टींवर निशाणा साधलाय.

राजू शेट्टी माझ्यावर आरोप करतात. या देशात न्यायव्यवस्था आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात जावं. सदाभाऊनं त्यांच्यासारख्या 300-400 एकर जमिनी घेऊन ठेवलेल्या नाहीत. सरकारला आंदोलनाची भीती दाखवून सहकाऱ्यांना पेट्रोल पंप, संस्था काढलेल्या नाहीत, अशी टीका खोत यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

सध्या महाविकास आघाडी सरकारची अवस्था ‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडं’- चंद्रकांत पाटील

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

दुचाकीवरून प्रवास करताना लोकल ब्रँडचे हेल्मेट वापरल्यास होणार दंड!

अविनाश… आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया- संदीप देशपांडे

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड- अशोक गेहलोत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या