Pune | देशाला आणि राज्याला योग्य दिशा दाखवणं हे राज्यकर्त्यांचं प्रमुख काम असतं. आज देश आणि मोठ्या झपाट्याने प्रगती करत आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासारख्या सुसंस्कृत व्यक्तीला निवडून देणं, ही आपली जबाबदारी आहे, असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं.
सुरेश प्रभूंचं कोथरूडकरांना आवाहन
अर्थ संवादच्या वतीने भारताचे पाच ट्रिलियन डॉलर युग आणि त्यामध्ये सीए सीएसचे स्थान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात दृकश्राव्य माध्यमातून सहभागी होऊन त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत पाटील सीए अशोक नवाले, हर्षद देशपांडे, राघवेंद्र जोशी, दिनेश गांधी यांच्या सह पुणे शहरातील सीए सीएस उपस्थित होते.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, निवडणूक हा लोकशाहीचा यज्ञ आहे. देश आणि राज्याला योग्य दिशा दाखवणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे. पुणे आणि कोथरुडने नेहमीच देशाला दिशा दिली आहे. आज देश झपाट्याने प्रगती करत आहे. महाराष्ट्र ही कुठे मागे राहिलेला नाही. चंद्रकांत पाटील हे अतिशय सुसंस्कृत, संवेदनशील आणि संयमी व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे अशा व्यक्तीमत्वाचे हात बळकट करणं आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) निवडून द्यावं, असं आवाहन केलं.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सीए आणि सीएस हे समाजातील प्रभावशाली क्षेत्र आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशासाठी चांगलं जगलं पाहिजे, प्रत्येकाने आपले क्षेत्र आणि सामाजिक काम नीट केलं पाहिजे. मतदान ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून ती पूर्ण केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ सुप्रसिद्ध सिंगरचा बाथरूममधला व्हिडीओ तूफान व्हायरल!
राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का; अजितदादांच टेन्शन वाढलं
महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना ‘इतके’ पैसे मिळणार!
राजकारण ‘या’ भाजीसारखं झालं आहे… बड्या नेत्यानी सर्वच पक्षांना घेरलं!
महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश