Harshvardhan Jadhav Arrest l छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना सोमवारी नागपूर (Nagpur) पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर अधिकृतरीत्या अटक केली जाणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यात वारंवार वॉरंट बजावूनही ते न्यायालयात हजर झाले नव्हते, त्यामुळे न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले होते. हा गुन्हा सरकारी कामात अडथळा आणण्यासंबंधी आहे.
२०१४ मधील प्रकरणामुळे अटक :
न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर कारवाई केली. २०१४ साली नागपूर विमानतळावर शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकारी स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेनंतर सोनेगाव (Sonegaon) पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 353 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते.
Harshvardhan Jadhav Arrest l न्यायालयात हजर न राहिल्याने अटक :
या प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्यावर अनेक वेळा वॉरंट निघाले होते, मात्र ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी केले. सोमवारी ते नागपूर न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना अटक करण्याचे आदेश दिले आणि त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) रवानगी करण्याचे निर्देश दिले.
आरोग्य बिघडल्याने रुग्णालयात दाखल :
अटक केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) नेण्यात आले. तपासणी दरम्यान त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील २४ तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना अधिकृतरीत्या अटक करण्यात येणार आहे. सध्या सोनेगाव पोलिस रुग्णालयात त्यांच्यावर नजर ठेवून आहेत.
News Title : Former MLA Harshvardhan Jadhav Arrest