महाराष्ट्र मुंबई

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुणे पोलिसांकडून अटक; पाहा काय आहे प्रकरण…

पुणे | माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक झाली आहे. हर्षवर्धन जाधव यांना आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकी स्वाराला मारहाण केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

हर्षवर्धन जाधव यांच्याकडून अटक टाळण्यासाठी छातीत दुखत असल्याचं कारण सांगण्यात येत होतं. मात्र अखेर पुणे पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांची ससूनमध्ये तपासणी करुन त्यांना अटक केली.

हर्षवर्धन जाधव यांना आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. कारण पुणे पोलीस त्यांना उद्याच शिवाजीनगर कोर्टात हजर करणार आहेत. न्यायालयासमोर हजर केल्यानंतरच त्यांना जामीन मिळतो की नाही हे स्पष्ट होणार आहे. हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासह इषा झा यांच्याविरोधातही खूनाचा गुन्हा दाखल आहे.

थोडक्यात बातम्या-

आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत नवीन दर!

भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय पंतप्रधान मोदींना जात- मुकेश अंबानी

कोरोनाची लागण झालेले मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली

भाजप हीच खरी तुकडे तुकडे गँग- सुखबीर सिंग बादल

ईडीचा वापर तुम्ही कसा करताय? मुख्यमंत्र्यांचा भाजपला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या