मुंबई | माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची तब्येत बिघडल्याने ते काही काळ विश्रांती घेणार आहत. आपल्याला आता राजकारणात काही नको, पण तुम्हाला हवा असणारा आमदार माझा मुलगा आदित्यच्या रुपाने जाधव कुटुंब तुम्हाला 2029 मध्ये देईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
कन्नडच्या नागरिकांना माहिती आहे, थोडीशी तब्येत नादुरुस्त आहे, शुगर वाढलेली आहे, मध्यंतरीच्या काळात ऑपरेशन करण्याचं ठरलं होतं, मात्र माझ्या मुलाने सांगितलं की पप्पा तुम्ही थोडं थांबा, आपण कंट्रोल होतंय का पाहुया, पण दुर्दैवाने कंट्रोल काही झालं नाही, म्हणून एक ते दीड महिन्याचा रेस्ट मला सांगितला आहे, त्यामुळे दरम्यानच्या काळात मी सेवेत उपलब्ध नसेन, असं माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं.
हर्षवर्धन हे मनसेचे माजी आमदार आहेत. मनसे ऐन भरात असताना विधानसभेवर निवडून गेलेल्या 13 आमदारांमध्ये जाधव यांचा समावेश होता.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर पक्षांतर्गत वादामुळं मनसेला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूकही जिंकली होती. मात्र, तिथंही त्यांचं बस्तान बसलं नाही. त्यांनी शिवसेनेलाही जय महाराष्ट्र केला.
शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांनी स्वत:चा शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढला. मागील लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
- नव्या वर्षात कार घेणार असाल तर थांबा; नाहीतर बसेल डबल फटका
- आता फोनपेवरून ‘इतकेच’ पैसे ट्रान्सफर करता येणार!
- ‘या’ कंपन्यांच्या SUV वर मिळतेय तब्बल ‘इतक्या’ रूपयांची सूट
- ‘संभल जा, अभी भी टाईम है’; सुषमा अंधारेंचा ‘या’ नेत्याला इशारा
- ‘महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला’, ठाकरेंची मोदींवर जोरदार टीका