Uddhav Thackeray group | लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉँग्रेसने महायुतीला चांगलाच धक्का दिला. लोकसभेच्या निकालानंतर महायुतीमधील बऱ्याच नेत्यांनी घरवापसी केली आहे. तर, काही जण अजूनही पक्ष बदल करत आहेत. अशात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray group) यांनी भाजपला मोठा झटका दिला आहे.
शिवसेनेचे 9 खासदार निवडून आल्याने उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह आता अधिकच वाढला आहे. याचसोबत शरद पावर गटात देखील अनेक नेत्यांची इनकमिंग सुरू असल्याचं चित्र आहे.
माजी आमदार रमेश कुथे यांचा भाजपला धक्का
काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील काही पदाधिकाऱ्यांनी ‘तुतारी’ हाती घेतली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
आता गोंदियामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील एका माजी आमदाराने पुन्हा घरवापसी केली आहे. शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात (Uddhav Thackeray group) घरवापसी केली आहे. त्यामुळे, गोंदियातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.
रमेश कुथे यांचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश
रमेश कुथे यांनी 2019 मध्ये शिवसेनेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता तब्बल 6 वर्षांनी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा शिवसेनेचा हाथ धरला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला.
रमेश कुथे यांनी 1995 आणि 1999 अशी दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर, मात्र 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेसचे गोपालदास (Uddhav Thackeray group) अग्रवाल यांनी पराभव केला होता. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा उद्धव ठाकरे गटात परतले आहेत.
News Title – former mla ramesh kuthe joins Uddhav Thackeray group
महत्त्वाच्या बातम्या-
महिलांनी आपल्या जीवनात ‘या’ सहा गोष्टी कुणालाही सांगू नयेत; अन्यथा वैवाहिक जीवन..
मुंबईत पावसामुळे दाणादाण, आजही रेड अलर्ट जारी; पोलिसांकडून मुंबईकरांना महत्वाच्या सूचना
लाडकी बहीण योजनेनंतर सरकारचं शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल; आता थेट..
“..पेक्षा मोठा पश्चाताप कोणताच नाही”; परिणीती चोप्राच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?
राज्यभरात पावसाचा धुमाकूळ! ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना 8 दिवस सुट्ट्या जाहीर