बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार संभाजी पवार काळाच्या पडद्याआड

सांगली | बिजलीमल्ल म्हणून ओळख असणारे माजी आमदार संभाजी पवार यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यावर राजकीय पैलवान-संभाजी पवार हे पुस्तक प्रकाशित झाले होते. गेले काही वर्षे ते पार्किन्सनच्या जुनाट आजाराने त्रस्त होते. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी हिमतीने मात केली होती.

वज्रदेही मल्लहरी नाना पवार यांचे सुपुत्र म्हणून ते ओळखले जात होते. मात्र अवघ्या काही क्षणात कुस्तीचा निकाल दुसऱ्या मल्लाला आसमान दाखवायंचं त्यांच्या या खास पद्धतीमुळे त्यांची बिजली मल्ल म्हणून ख्याती पसरली होती.  महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचे चाहते होते.

कुस्तीने मिळलेल्या प्रसिद्धीनंतर त्यांनी  राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले आणि स्व. वसंतराव दादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णू अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करत विजय मिळवला होता. 2009 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्षही होते.

दरम्यान, 12 वाजता त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार आहे. 1 वाजता मारुती चौकात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

काय सांगता! भर सोहळ्यात अभिनेत्रीनं काढले रक्ताळलेले कपडे अन्….

सचिन वाझेंना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला- संजय राऊत

‘हा’ आयपीओ बाजारात बुधवारी धडकणार; गुंणतवणुकदांरांंना मोठी संधी

‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’; संजय राठोडांच्या मतदारसंघातील शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More