माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या अपघाताचा व्हिडीओ समोर!

Tukaram Bidkar l राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार तुकाराम बिडकर (Tukaram Bidkar) यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची विमानतळावर भेट घेतल्यानंतर परतत असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिडकर यांच्यासह अन्य दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मंत्र्यांना भेटण्यासाठी बिडकर हे दुचाकीवर गेले होते. हीच त्यांच्याकडून चूक झाली, असं बोललं जात आहे.

अपघाताचा तपशील :

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शिवणी विमानतळावर (Shivni Airport) येणार होते. त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर हे दुचाकीवरून गेले होते. त्यांची भेट झाल्यानंतर ते परतीचा प्रवास करत असतानाच त्यांच्या दुचाकीला एका मालवाहू गाडीने जबर धडक दिली.

शिवणी विमानतळावरून परत येत असताना शिवर गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) हा अपघात झाला. दुचाकीवर प्रा. तुकाराम बिडकर व त्यांचे मित्र प्रा. राजदत्त मानकर (Rajdatta Mankar) होते. ते यात गंभीर जखमी झाले. त्यांना लगेचच वाहनातून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

ज्या वाहनाने बिडकर यांच्या दुचाकीला धडक दिली, त्या वाहनातून जनावरांची वाहतूक केली जात होती. गाडी वेगाने नेण्याच्या नादात हा अपघात झाला. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीही तुकाराम बिडकर यांचा अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर त्यावेळी मुंबईत (Mumbai) उपचार करण्यात आले होते. त्यातून ते सावरले होते. तोच त्यांचा पुन्हा अपघात झाला. यावेळी मात्र त्यांना मृत्यूने गाठले.

Tukaram Bidkar l राजकीय आणि सामाजिक कारकीर्द :

तुकाराम बिडकर यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले होते. ते मूर्तिजापूर मतदारसंघातून (Murtijapur Constituency) विधानसभा निवडणूक जिंकले होते. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) काम करत होते. तुकाराम बिरकड २००४ ते २००९ या काळात मुर्तीजापूर मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी याकाळात जय बजरंग नावाने व्यायाम शाळा उभ्या केल्या होत्या. त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात सर्वच क्षेत्रात काम करण्यावर भर दिला होता.

 

News Title: Former MLA Tukaram Bidkar Dies in Road Accident After Meeting Minister