पुणे महाराष्ट्र

माजी खासदार यशवंतराव गडाखांचे चिरंजीव ‘या’ संघटनेतून निवडणूक लढवणार

अहमदनगर : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. शंकरराव गडाख भाजपात प्रवेश करणार की शिवसेनेत जाणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं खुद्द शंकरराव गडाख यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलं आहे.

शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे यशवंतराव गडाख गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्षांपासून दूर आहेत. गेल्या निवडणुकीत शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवली होती. मात्र केवळ चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणामुळे आपण पराभूत झाल्याची गडाखांची धारणा झाल्याने त्यांनी अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादीतून बाहेर पडत क्रांतिकारी शेतकरी पक्ष स्थापन केला.

दरम्यान, विधानसभेत गडाख भाजपात प्रवेश करणार, अशी चर्चा होती. मात्र कार्यकर्त्यांच्या झालेल्या मेळाव्यात कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं गडाख यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या