‘अनिल देशमुखांनी वाझेंना महिन्याला 100 कोटी जमा करायला लावले होते’; माजी मुंबई पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप
मुंबई | सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्र यावरून परमबीर सिंह हे नाराज असल्याचं समोर येत होतं. मात्र अशातच परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्टॉरंट आणि अन्य आस्थापनांमधून 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी पत्रातून केला असल्याची माहिती समजत आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर मोठी खळबळ माजली असूून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा देशमुख उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले असल्याचा आरोपही सिंह यांंनी पत्रातून केला आहे.
दरम्यान, गेल्या 13 महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फोटकं कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदारोळामुळे परमबीर सिंग अडचणीत आले आणि त्यांची उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्याकडे होमगार्डची जबाबदारी देण्यात आली. सिंह यांच्या जागी हेमंत नगराळे यांची वर्णी लावण्यात आली आहे.
Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh writes to Maharashtra CM Uddhav Thackeray claiming Home Minister Anil Deshmukh’s involvement in severe “malpractices”.
“HM Deshmukh expressed to Sachin Waze that he had a target to accumulate Rs 100 cr/month,” letter reads pic.twitter.com/g6gSIaKIww
— ANI (@ANI) March 20, 2021
थोडक्यात बातम्या-
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण
‘ती खरंच गरीब आहे का?’; सायली कांबळेला गरीब दाखवल्याने ‘इंडियन आयडल 12’ वादाच्या भोवऱ्यात
धक्कादायक! नवरा रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत असल्यामुळे नाराज होऊन बायकोने….
ए दिल है मुश्किल! इम्रान खान यांनी घेतली चीनची कोरोना लस अन् दोन दिवसातच झाला कोराना
“सोनिया गांधी राजकारणात सक्रिय नाहीत, ‘यूपीए’ला सक्षम करण्यासाठी शरद पवारांनी नेतृत्व करावं”
Comments are closed.