बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन!

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं मंगळवारी एका खाजगी रूग्णालयात निधन झालं. मुंबईचे तडफदार पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. ह्रद्यविकाराच्या झटका आल्यानं त्याचं निधन झालं आहे. मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वाईमध्ये पुर्ण झाल्यावर त्यांनी एमएससी केली होती. त्यानंतर ते रायगडला शिक्षणअधिकारी म्हणून रूजू झाले होते. धनंजय जाधव हे 1973 बॅचचे आयपीएस अधिकारी होते.

धुळे, वर्धा, अहमदनगर,पुणे या ठिकाणी पोलीस अधिक्षक म्हणून त्यांनी काम केलं होतं. काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली होती. 2004 ते 2007 मध्ये त्यांची पुण्याच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी 2007 मध्ये मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळली होती. मुंबईत त्यांनी गुन्हेगारीवर चांगलाच वचक बसवला होता.

दरम्यान, 1992 मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याच वर्षी राज्यांच्या पोलीस महासंचालकांनी सन्मान चिन्ह देऊन धनंजय जाधव यांचा सन्मान केला होता. पोलीस दलात केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तर त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या पुसेगाव या मुळगावी करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”

पार्थ पवारांनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

“मोदी बांगलादेशात जाऊन आले पण त्यामुळे तेथील हिंदू अधिक असुरक्षित झाला”

शरद पवारांच्या तब्येतीची मोदींनाही काळजी; फोन करत केली विचारपूस

नांदेडमध्ये तलवारी उगारत शीख समुदायाची मिरवणूक, पोलिसांवर केला हल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More