बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विराटने खेळभावनेने पराभव स्वीकारला, मला त्याचं कौतुक वाटतंय”

मुंबई | टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत भारतावर पाकिस्तानने 10 गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे विश्वचषक स्पर्धेमधील भारताची सलग विजयाची परंपरा अखेर पाकिस्तान खंडीत केली आहे. तसेच भारतीय चाहत्यांना याचा मोठा धक्का बसला आहे. या पराभवामुळे सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंना ट्रोल केलं जात आहे. अशातच विराट कोहलीचं पाकिस्तानची माजी महिला कर्णधार क्रिकेटपटू सना मीरने कोहलीचं कौतुक केलं आहे.

सामना संपल्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानची विराट कोहलीने भेट घेतली. त्यावर जगभरातून या गोष्टीचं विराट कोहलीचं कौतुक केलं जात आहे. विराट कोहलीने पूर्ण खेळभावनेेने पराभव स्वीकारला आणि त्याच्या याच गोष्टीचं मी कौतुक करते. मोठ्या खेळाडूंनी अशा पद्धतीने वर्तन करणं, वास्तवात फार चांगलं आहे, असं सना मीरने म्हटलं आहे. या संदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील विराट कोहलीचा फोटो शेअर करत कौतुक केलं आहे.

विराट कोहलीने केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यात असणाऱ्या सुरक्षा भावनेचीही जाणीव होते. याचा अर्थ पुनरागमन करण्यासंबंधी त्यांना विश्वास आहे. त्यानंतर भारताने एखादा मोठा विजय मिळवत स्पर्धेत पुनरागमन केलं, तर मला आश्चर्य वाटणार नाही. तसेच मला आशा आहे की, भारत आणि पाकिस्तान एकदा या स्पर्धेत एकमेकांविरोधात मैदानात खेळताना दिसतील, असंही सना मीरने म्हटलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम भारताला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. तेव्हा भारताने पाकिस्तान समोर 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात पाकिस्तानच्या सलामीवीरांनी एकहाती किल्ला लढवला.  भारताचं 152 धावाचं लक्ष्य सहज पार करत पाकिस्तान संघाने भारतावर ऐतिहासिक विजय मिळवला.

थोडक्यात बातम्या-

“त्यांच्या सांगण्यावरून मलिक आरोप करतायेत, पुरावे असतील तर न्यायालयात जा”

“बिडीची जेवढी किंमत महाराष्ट्रात आहे तेवढी सुद्धा ईडीची राहिली नाही”

दिवाळीपूर्वी खवय्यांसाठी खूशखबर! ‘या’ गोष्टींच्या किंमतीत मोठी घट

निवडणुकीआधी भाजपची मोठी रणनिती! तब्बल 100 आमदारांचं तिकीट कापण्याची शक्यता

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात निवडणूक लढणार का?; आली ‘ही’ माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More