देश

‘पीएम केअर फंडाचा हिशोब सार्वजनिक करा’; माजी सनदी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र

नवी दिल्ली | पीएम केअर फंडाचा हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणी 100 माजी सनदी अधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

पीएम केअर फंड हा नागरिकांना आपत्कालीन मदतीसाठी तयार करण्यात आला होता. त्यात जमा झालेला निधी आणि खर्च याचा हिशोब सार्वजनिक करणं आवश्यक आहे, असं या पत्रात म्हटलंय.

पीएम केअर फंडाबाबत सुरू असलेल्या वादावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. ज्या उद्देशाने हा फंड तयार करण्यात आला आणि ज्या पद्धतीने याचे संचालन केले जात आहे, या दोन्हीबाबत अनेक प्रश्नचिन्ह आहेत. त्यावर अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही, असंही या पत्रात म्हटलं आहे.

पीएम केअर फंडाच्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकतेचा अभाव आहे. पीएम केअर फंडाची पारदर्शकता सुनिश्चित करावी. आतापर्यंत पीएम केअर फंडात किती निधी जमा झाला आणि किती खर्च करण्यात आला, याचा हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणी निवृत्त झालेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“ज्यांचं बोट धरुन महाराष्ट्रात आले त्याच सेनेला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न”

‘…म्हणून शिवसेनेने नामांतराचा ‘सामना’ सुरू केला’; बाळासाहेब थोरातांचा शिवसेनेवर पलटवार 

संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही- अजित पवार

“शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता, पण…”

“…तर मग काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत, सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या