बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून मुंबई इंडियन्सने पुन्हा यावर्षीही आयपीएल जिंकावी”

मुंबई | आयपीएलच्या रोमांचक सामन्यांना आता फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. जगातली सर्वात मोठी लिग म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. प्रेक्षकांमध्ये सुद्धा या आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यातच मुंबई इंडियन्सचा आणि भारतीय संघाचा माजी खेळाडू पार्थिव पटेल याने मोठं भाष्य केल आहे.

आयपीएल ही मनोरंजक स्पर्धा आहे. यात सर्वांना छाप सोडण्याची इच्छा असते. आतापर्यंत विराट कोहलीने ज्याप्रकारे खेळ केला आहे. ज्या प्रकारे ख्रिस गेलने आक्रमकपणे फलंदाजी केली आहे. केकेआरने ज्याप्रकारे आयपीएल फायनल जिंकली होती. ते सर्व मी पाहिलं आहे. पण मला आणखी एक विक्रम पाहायचा आहे, तो म्हणजे आयपीएलच्या विजेतेपदाची हॅट्रिक. हा विक्रम आणखी कोणत्याही संघाने केला नाही. त्यामुळे मुंबईने यावर्षी फायनल जिंकून हा विक्रम मोडीत काढावा, अशी इच्छा पार्थिव पटेल यांने प्रकट केली आहे.

पार्थिव पटेल यांने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने लगेच मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट स्काउटच्या पदाची जबाबदारी घेतली. त्यानंतर मुंबई संघात नवनवीन टॅलेट असणाऱ्या खेळाडूंचा शोध घेणाऱ्याची जबाबदारी त्याच्यावर आहे.

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मागील दोन वर्ष मुंबई इंडियन्सने आयपीएल ट्राॅफीवर आपलं नाव कोरलं आहे. यावर्षी मुंबई इंडियन्सने फायनल जिंकली तर अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ ठरणार आहे. त्याचबरोबर याआधी आयपीएलमध्ये सलग दोनवेळा चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद पटकावलं होतं. पण त्यांनी तिसऱ्यावेळी विजेतेपद पटकावता आलं नाही.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांनी घरीच घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

शिवभोजन थाळीसंदर्भात छगन भुजबळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!

वाढीव वीज बिल येऊ द्यायचं नसेल तर ‘हे’ करा- नितीन राऊत

डॉ. आंबेडकर जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More