मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नॅशनल स्टाॅक एक्स्चेंज मधील कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिग प्रकरणाशी निगडीत मनी लाॅड्रिंग प्रकरणात पांडेवर कारवाई करण्यात आली आहे. 5 जुलै रोजी मनी लाॅड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांच्यावर 2009 ते 2017 या दरम्यान बेकायदेशीर पद्धतीने टॅपिंग केल्याचा आरोप आहे.
2009 साली पांडेनी पोलीस खात्यातून राजीनामा देत स्वत:ची आयसेक सव्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (ISPL) ही आयटी कंपनी सुरु केली होती. 2006 ला आई आणि मुलाला कंपनीचे संचालक बनवत ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. संजय पांडे यांची कंपनी कडून एनएसईचे सर्व्हर, संगणकीय यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञान वापरण्यात आले आहेत.
2009 ते 2017 च्या दरम्यान एमएसई कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्याचा कट रचला होता. हा कट एमएसईचे व्यवस्थापक संचालक आणि सीईओ नारायण आणि रामकृष्ण, कार्यकारी उपाध्याक्ष रवी वाराणसी आणि प्रमुख महेश हल्दीपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासाठी त्यांनी आयसेक सव्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कामावर ठेवण्यात आलं होतं. यासाठी कंपनीला 4.45 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप एसबीआयने( SBI) केला होता.
यासर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वाची चौकशी सध्या सुरू आहे. संजय पांडे हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. 1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांच्या बदलीनंतर फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्त त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 30 जूनला त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे.
थोडक्यात बातम्या
सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर
ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जा, उगाच टीव्ही समोर जाऊन नाटकं करू नका- उद्धव ठाकरे
‘पीठ से निकले.. खंजरों को गिना जब…’; संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत
“उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना भेटले, म्हणाले मलाही युती करायचीये”
“सत्तेच्या नशेत धुंद झालेले बंडखोर महापुरुषांच्या प्रतिमा ढकलून देत आहेत”
Comments are closed.