नागरपूरमध्ये माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर चोरट्यांनी मारला डल्ला!

नागपूर | नागपूरमध्ये एक आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे. चक्क महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रबीर चक्रवर्ती यांच्या घरावरचं चोरट्यांनी डल्ला मारला आहे. झालेल्या प्रकारामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ माजली आहे.

सकाळी नियमितपणे पूजेला येत असलेल्या पूजाऱ्याला देवघरातून काही सोने आणि चांदीचा मौल्यवान ऐवज लंपास झाल्याचं कळलं. त्यानंतर त्यांनी ही घटना चक्रवर्ती कुंटुंबीयांना कळवली.

नागपूरच्या धरमपेठ भागातील झेंडा चौक परिसरात त्यांची चार मजली इमारत आहे. 

दरम्यान, चार महिन्यांपासून घरात काम करणारा नोकर चोरी झाल्यानंतर अचानक बेपत्ता झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच, कार्यकर्त्यांनो तयारीला लागा”!

-…तर लोकसभेसाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार- शिवपाल यादव

-भगवान बाबांच्या मूर्तीचा भाग अज्ञात समाज कंठकाने जाळला

-आज उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर!

-…म्हणून न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला मिळाली संधी