बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू!

नवी दिल्ली | जपानचे माजी आणि दिर्घकालीन पंतप्रधान शिंजो अबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जपानमधील नारा शहरात ते भाषण देत होते तेव्हा त्यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी रक्तस्त्राव होऊन ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

शिंजो आबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस त्याच्याकडून कसून चौकशी करत आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पश्चिम जापनच्या नारा शहरात भाषणादरम्यान कोसळले. ते नारा येथे भाषण देत होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाला.

जपानची वृत्त संस्था एनएचकेच्या एका पत्रकाराला गोळी चालल्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांना अबे यांच्या शरीरातून रक्त येताना दिसले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना कळविले. आणि पोलिसांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आरोपीला देखील अटक केली आहे.

शिंजो अबे हे 2006 ते 2007 आणि 2012 ते 2020 या कालखंडात जपानचे पंतप्रधान होते. अबे यांचा जन्म 21 सप्टेंबर 1954 रोजी झाला. जपानच्या लिबरल डेमोक्रेटीक पक्षाचे म्हणजे एलडीपीचे ते अध्यक्ष होते. त्यांचा जन्म टोकीयोमधील एका राजकीय कुटूंबात झाला होता. ते 68 वर्षांचे होते. ते आतापर्यंत जपानचे दिर्घकालीन पंतप्रधान होते. त्यांना कार्डीआक अरेस्टचा झटका आल्याची देखील माहिती आहे.

थोडक्यात बातम्या- 

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखी खालावली, महत्त्वाची माहिती समोर

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट, शिंदे गटाच्या आमदारांना राग अनावर

मुंबईकरासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More