बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

नवी दिल्ली | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना गेल्या महिन्यातच पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर इम्रान खान यांनी अमेरिकेला (USA) पाकिस्तानात लष्करी तळ बनवायचे असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानात (Pakistan) लष्करी तळ बनवण्याची मागणी केली होती. मात्र, मी त्याला नकार दिला. अमेरिकेच्या मागणीसाठी मी कधीच तयार नव्हतो आणि तिथूनच आमच्या अडचणी वाढण्यास सुरूवात झाली, असं देखील इम्रान खान म्हणाले आहेत.

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांविरोधातील युद्धात पाकिस्तानातील 80 हजार लोकांनी आधीच जीव गमावला आहे. असं असूनही त्यांच्या बलिदानाचे कधीच कौतुक झाले नाही. उलट अमेरिकन राजकारणी आम्हालाच जबाबदार धरू लागले, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

दरम्यान, आधी त्यांनी आमच्यावर आरोप केले. त्यानंतर त्यांनी आमचा देश आणि आदिवासी भाग उद्ध्वस्थ केला. आणि यानंतर त्यांनी लष्करी तळाची मागणी सुरू केली, असा दावा इम्रान खान यांनी केला आहे. तर मी यासाठी कधीच तयार नसल्याचंही इम्रान खान म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘बाप’रे! 70 व्या वर्षी पुतिन पुन्हा बाप होणार; युद्धजन्य परिस्थितीत गर्लफ्रेंड प्रेग्नेंट

‘माझा संशयास्पद मृत्यू झाला तर…’; स्वत:च्याच मृत्यूबाबत Elon Musk यांचं खळबळजनक ट्विट

एकनाथ खडसेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले…

पुतिन यांना जोर का झटका! अमेरिकेसह जी-7 देशांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मोठी बातमी! नवनीत राणांचा जामीन रद्द होणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More