बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांना ईडीनं ताब्यात घेतलं

मुंबई | अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील 900 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करत आहे. ईडीचे अधिकारी आज सकाळी 6 वाजता अडसूळ यांच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळाली होती.आनंदराव अडसूळ यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनाही ईडीने समन्स पाठवल्याची माहिती आहे.

आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

दरम्यान, सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत वसूल करण्यात आला ‘इतक्या’ कोटींचा दंड

प्रत्येक भारतीयाला मिळणार हेल्थ कार्ड, पंतप्रधान मोदी करणार आयुष्मान डिजिटल मिशनचा प्रारंभ

विदर्भ-मराठवाड्याच्या बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, म्हणाले…

तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची आज ‘भारत बंद’ची हाक!

SBI सारख्या चार ते पाच मोठ्या बॅंकांची देशाला गरज- निर्मला सीतारामन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More