बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

बंगळुरू | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर फर्नांडिस यांच्यावर कर्नाटकातील मंगळुरू येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे.

जुलै महिन्यात योगा करत असताना खाली पडून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांच्या मेंदूला जबर मार लागल्यानं मेंदूमध्ये रक्त साठत होतं. त्यामुळे त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. त्यानंतर त्यांना मंगळुरूच्या येनेपाॅय रूग्णालयात उपचार सुरू होतेे. पण, आज सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

ऑस्कर फर्नांडिस हे युपीए सरकारच्या काळात केंद्रीय परिवहन मंत्री होते. गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. ऑस्कर फर्नांडिस यांनी  राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणून देखील काम पाहिलं आहे. तसेच त्यांनी काँग्रेसच्या अखिल भारतीय केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाची अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

ऑस्कर फर्नांडिस हे 1980 साली कर्नाटकच्या उडुपी मतदारसंघातून विजय मिळवत खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी याच मतदारसंघातून सलग 1984, 1989, 1991 आणि 1996 मध्ये निवडले गेले. त्यानंतर त्यांना 1998 मध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत ऑस्कर फर्नांडिस राज्यसभा खासदार होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसमध्ये शोककळा पसरली आहे.

थोडक्यात बातम्या –

सुशांतसिंग राजपूत पुन्हा चर्चेत! ट्विटर अचानक ट्रेंड होतंय ‘CBI CONFIRMS SSR MURDER’

पैसे परत न दिल्यानं भरमंडईत महिलेची छेडछाड; महिलेनं दिला आत्मदहनाचा इशारा

‘काॅंग्रेसनेच दहशतवादाला जन्माला घातलं’; योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर जहरी टीका

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More