बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

 माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह चौधरींचं कोरोनामुळे निधन

लखनऊ | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं संपूर्ण देश चिंताग्रस्त झाला आहे. कोरोनामुळे मोठ-मोठ्या लोकांचे बळी गेले आहेत. त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. राष्ट्रीय लोकदलाचे 86 वर्षीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचं गुरुवारी कोरोनामुळे दु:खद निधन झालं.

अजित सिंह यांना कोरोनाची लक्षणं जाणवायला लागल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून अजित सिंह यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, मंगळवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला होता. परिणामी त्यांची प्रकृती नाजूक झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

अजित सिंह चौधरी हे देशाचे माजी पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांचे सुपूत्र होते. उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून ते सातवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. अजित सिंह चौधरी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख जाट नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या निधनाबद्दल रालोद आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या त्रिस्तरीय पंचायत निवडणुकांमध्ये रालोद आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीला लक्षणीय यश मिळालं होतं. बागपत, मेरठ, शामली, अलीगढ आणि मथुरेत रालोद पक्षानेच चांगली कामगिरी केली होती. जाट समुदायाचा प्रभाव असलेल्या बागपतमध्ये रालोदने 20 पैकी 7 वॉर्डांमध्ये विजय मिळवला होता. या विजयानंतर रालोद कार्यकर्ते जल्लोष करणार होते. मात्र, अजित सिंह चौधरी यांच्या मृत्यूनं सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायला उशीर झाल्यास लस परिणाम करेल का?; वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…

रिषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

“मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण देणे हा एकच पर्याय”

आसाराम बापू आयसीयूमध्ये दाखल; काही दिवसांपुर्वी झाला होता कोरोना

‘मराठा आरक्षण हा पेटवापेटवीचा विषय नाही’; सामनातून विरोधकांवर टीकेचे बाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More