बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळे निधन

अहमदनगर | देशात कोरोनाचं संकट कमी होताना पाहायला मिळत नाही. त्यातच माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनावरील उपचारादरम्यान दिलीप गांधी यांची आज पहाटे दिल्लीत प्राणज्योत मालवली.

दिलीप गांधी हे संघ परिवारात मोठे झाले तसेच भारतीय जनता पक्षाशी ते कायम एकनिष्ठ राहिले. दिलीप गांधी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. तसेच एक वेळा त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषवलं. 2019 ला लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांना पक्षाने संधी दिल्याने त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं.

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये संधी मिळाली नाही तरीही खचून न जाता त्यांनी पक्ष उभारणीसाठी आणि सुजय विखे यांच्या प्रचारार्थ अथक परिश्रम घेतले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी अहमदनगरमध्ये आले असताना व्यासपीठावर बोलताना दिलीप गांधींना भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी थांबण्यास सांगितल्याने ते चिडले होते. यावेळी सुजय विखे यांनी त्यांना तुम्ही बोला सर, अशी विनंती केली आणि त्यादरम्यान बोलताना दिलीप गांधी हे भावुक झाल्याचं दिसून आलं होतं.

2003 ते 2004 यादरम्यान भाजप सरकारच्या कार्यकाळात दिलीप गांधी यांनी केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. 2019 ला पक्षाने तिकीट नाकारल्यानंतरही सुजय विखे यांच्या विजयासाठी दिलीप गांधी यांनी मतदारसंघात विशेष प्रयत्न केले. आज पहाटे दिलीप गांधी यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं दुःखद निधन झालं आहे. निधनाची बातमी कळताच संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली असून अनेक सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी त्यांना समाजमाध्यमांवर श्रद्धांजली अर्पण केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आईची आठवण आल्याने केली भावनिक कविता शेअर!

बटलरची खेळी विराटवर भारी; दणदणीत विजयासह इंग्लंड मालिकेत आघाडीवर

‘या’ महापालिका हद्दीतील शिक्षकांना घरून काम करण्याचे आदेश!

महाराष्ट्रासाठी आरोग्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे ‘इतक्या’ कोटी लसींची मागणी!

जाणून घ्या…महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More