बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

पुणे | माजी केंद्रीय मंत्री आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मोहिते यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.

शिवसेनेत असताना त्यांनी नारायण राणे यांच्यासोबत पक्षाला रामराम ठोकला होता. मोहिते यांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास केलाय. सुबोध मोहिते हे पहिल्यांना शिवसेनेकडून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून लोकसभेवर गेले होते.

आज अखेर सुबोध मोहिते यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. पवारांनी त्यांच्या हाती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा देत त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही उपस्थित होते.

सुबोध मोहिते संसंदेत आल्यावर उत्तम काम करणारा तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहत होतो. अलीकडे ते राजकीय वर्तुळापासून बाहेर होते असं दिसत होतं. पण आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन विदर्भात राष्ट्रवादीचं काम वाढवण्याचा शब्द दिला आहे. त्यांच्या अनुभवाचा, कर्तृत्वाचा वापर सामान्य जनतेच्या भल्यासाठी कसा करुन घेता येईल, हे राष्ट्रवादी काँग्रेस पाहिलं, असं शरद पवार मोहितेंच्या पक्षप्रवेशावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील पण…’; खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा; आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

‘कर नाही, तर डर कशाला’; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला

जे आहे मराठा समाजाचे खणखणीत नाणे, त्याचं नाव नारायण राणे- रामदास आठवले

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More