‘या’ राज्यात काँग्रेसला मोठा झटका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं सध्या काँग्रेसची (Congress) पक्षाला बळकट बणवण्याची तयारी सुरु आहे. अशातच आता महाराष्ट्रातील आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. याचदरम्यान दक्षिण भारतात केरळमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री एके. एटनी (AK. Etni) त्यांच्या काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये राजीनामा देण्याचं कारण देखील सांगितलं असल्याचं दिसून येत आहे.

सध्या बीबीसी (BBC) प्रदर्शित मोदींवर बणवण्यात आलेल्या एका डाॅक्युमेंट्रीमुळं वाद सुरु आहे. केंद्र सरकारनं ती डाॅक्युमेंट्री सगळ्या सोशल मिडियावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडं काँग्रेस पक्षानं ही डाॅक्युमेंट्री दाखवली गेली पाहिजे अशी मागणी केली होती.

काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाला पाठिंबा न देता एटनी यांनी या डाॅक्युमेंट्रीच्या (Documentary) समर्थनार्थ एक ट्विट केलं होतं. ते ट्विट डिलीट करण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाकडून दबाव टाकला गेल्याचं त्यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या ट्विटमध्ये सांगितलं आहे. त्यामुळेच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी एटनी यांना पाठिंबा दिला आहे. अनिल एटनी यांनी आपल्या राजीनाम्यात थरुर यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, बीबीसीने ने “इंडिया: द मोदी क्वेश्र्चन” ही 2002 च्या गुजरात दंगलीवर आधारित डाॅक्युमेट्री बनवली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांच्या विरोधात अनेक गोष्टी दाखवल्या गेल्याचे आरोप होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या