बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनाच्या संकटातही मैदानात उतरण्यासाठी आतूर’; फिक्सिंगमध्ये सापडलेल्या ‘या’ खेळाडूवरील बंदी बीसीसीआयने हटवली

मुंबई | स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या अंकित चव्हाणवरची बंदी बीसीसीआयने हटवली आहे. अंकित चव्हाणवरची आयुष्यभरासाठी घातलेली बंदी काढली आहे. श्रीसंतसह अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यासह स्पाॅट फिक्सिंग प्रकरणात 36 आरोपींना जुलै 2015ला पटियाला हाऊस कोर्टाने दोषी ठरवलं होतं.

अंकितवर सट्टेबाजी, भ्रष्टाचार आणि क्रिकेट खेळावर डाग लावल्याचा आरोप होता. ज्यावेळी या तिन्ही खेळाडूंनी बंदी घालण्यात आली होती त्यावेळी ही आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे खेळाडू होते. लोकपालांनी दिलेला आदेश आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार अंकित चव्हाण याच्यावरची आजीवन बंदी 7 वर्षांची करण्यात येत आहे, म्हणजेच त्याला करण्यात आलेली शिक्षा मागच्या सप्टेंबर महिन्यात संपली आहे, असं बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांनी सांगितलं

मागील वर्षी श्रीसंतवरची आजीवन बंदी 7 वर्ष केली.  यानंतर त्याने केरळकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं. श्रीसंतने आयपीएल 2021 लिलावासाठी स्वत:ला उपलब्ध केलं होतं मात्र त्याला कोणीही बोली लावली नाही. त्यानंतर अंकित चव्हाणनेही आपल्यावरची बंदी कमी करावी आणि प्रत्येकाला सारखाच नियम लावावा, अशी मागणी बीसीसीआयकडे केली होती.

दरम्यान, कोरोना संकट आणि पाऊस असतानाही मी मैदानात उतरण्यासाठी आतूर असल्याचं अंकित म्हणाला. त्यासोबतच त्याने बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेटचे आभार मानले आहेत.

थोडक्यात बातम्या-

मन पिळवटून टाकणारी घटना! 15 दिवस फक्त पाणी पिऊन काढले दिवस

नियतीचा क्रुर डाव! माय-लेकीचा कोरोनाने केला घात, दोघींचा एकाचवेळी दशक्रिया विधी 

सततच्या होणाऱ्या सायबर क्राईम पासून वाचण्यासाठी SBI ने सांगितले ‘हे’ मार्ग

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ विषयाचे अतिरिक्त गुण मिळणार

“एकटा संभाजी काय करणार?, त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More