Top News आरोग्य औरंगाबाद कोरोना महाराष्ट्र

औरंगाबाद शहरात विना-मास्क ऑटो चालकांवर होणार ‘ही’ कारवाई

Photo Courtesy- Photo Gallery/Sameer More

औरंगाबाद | औरंगाबाद शहरात वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेता पोलीस प्रशासनाने हात घट्ट केले आहेत. शहरात सर्रास विना मास्क नागरिक फिरताना दिसत आहेत. याची स्थानिक प्रशासनाने गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.

औरंगाबाद शहरात आता ऑटो चालक विना-मास्क आढळून आल्यास त्याची रिक्षा जप्त करण्याचा मोठा आणि महत्वपुर्ण निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

शहरात एकूण 30 हजारांहून अधिक ऑटो चालक आहेत त्यापैकी बहुतांश जण हे विना मास्क गाडी चालवताना आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. महापालिकेकडून वारंवार सांगण्यात येऊनही नियमाचे काटेकोर पालन होताना दिसून येत नाही. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

कठोर पाऊले उचलल्याशिवाय आपल्या देशात नियमांचं पालन होत नाही हे ही शाश्वत सत्य आहे त्यामुळे, पोलिसांच्या या भूमिकेबद्दल सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी कठोर निर्णय घेणं ही काळाची गरज असल्याचं औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी बोलून दाखवलं आहे.

यापुढे औरंगाबाद शहरात घरी विलगिकरण करण्याचा पर्याय बंद करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे हा पर्याय देण्यात येत होता. पण आता हा पर्याय यापुढे देण्यात येणार नाही.

थोडक्यात बातम्या-

विना मास्क बुलेट सवारी करणं पडली महागात; नवनीत राणा आणि आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल

गजानन मारणे प्रकरणाला वेगळं वळण; ‘ती’ लॅंड क्रुझर आणणाऱ्यासह 8 जणांना अटक!

पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियात व्हायरल!

“खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला, शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं पाहिजे”

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या