बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात अपघातांचं सत्र सुरुच, सकाळपासून एकापाठोपाठ चार अपघात

पुणे | पुण्यात सकाळपासून चार अपघात झाले आहेत. या चार अपघातात एकूण दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. पुणे बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याकडून नऱ्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर 1 जण गंभीर जखमी झाला. तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

दुसरा अपघात स्पेअर पार्ट घेऊन जात असलेला एक आयशरला दुसऱ्या एक वाहन घासून गेल्याने झाला. या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

नवीन कात्रज बोगदा दरी पुलाकडून साताऱ्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरने 4 वाहनांना उडवलं. यामध्ये एका रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीचा चुराडा झालाय.

नऱ्हे येथील अपघाताची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी जात असताना भरधाव कंटनेरने सिंहगड पोलिसांच्या गाडीला उडवलं. यामध्ये पोलिसांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचारी गंभीर जखमी झालेत.

थोडक्यात बातम्या-

चेंडू छेडछाडीनंतर हे वाईट कृत्य करताना स्मिथ सापडला रंगेहात; पाहा व्हीडीओ

पंचांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पेनला आयसीसीने दिला झटका!

खळबळजनक! नालासोपाऱ्यात घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून तिच्यावर बलात्कार

सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला इतक्या कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार

इच्छा नसताना दबावामुळे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली; नितीश कुमारांचा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More