बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सांगलीकरांसाठी मोठा दिलासा; इस्लामपूरमधील 4 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

सांगली | राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. इस्लामपूरमधील 4 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाल्याचं कळतंय.

सांगली आरोग्य विभागाने ते कोरोनामुक्त झाल्याचं स्पष्ट केलं आहे. इस्लामपूरमधील या चारही कोरोना बाधितांचे दुसऱ्या कोरोना चाचणीचे अहवाल आज मिळाले. यात त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली.

पहिली कोरोना चाचणी निगेटीव्ही आली. त्यानंतर आज दुसऱ्यांदा त्यांची चाचणी निगेटीव्ही आली. असं असलं तरी खबरदारी म्हणून आणखी 2 ते 4 दिवस अजून या रुग्णांना हॉस्पिटलमध्येच निरिक्षणाखाली ठेवलं जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांचा आकडा 690 वर गेला आहे. तर राज्यातील ‘कोरोना’बळींची संख्या 36 वर पोहोचली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!

पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर

महत्वाच्या बातम्या-

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई नाही, जादा दराने विकणार्‍यांना शासनाचा कारवाईचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा शरद पवारांना फोन; तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

“तबलिगीच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोना संसर्गाचा वेग दुप्पट झाला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More