बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारा अपघात, चार मित्रांचा मृत्यू

नाशिक | मुंबई- आग्रा महामार्गावरील वाडिवऱ्हे शिवारात बुधवारी एक ह्रद्य पेळवटून टाकणारी घटना घडली आहे. बकरी ईदचा सण आटोपूून स्कोडा मोटारीने आपल्या घरी परतणाऱ्या पाच तरुणांपैकी चार जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. हे चारही मृत तरुण जुने नाशिक वडाळारोड या भागात राहणारे होते. या घटनेमुळे सपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

बुधवारी सकाळी हे पाच तरुण ईगतपुरी येथे गेले होते. तेथून नाशिककडे परतत असताना मुंंबई-आग्रा महामार्गावर वाडिवऱ्हे येथे मुंबईकडे जाणारा एक कंटेनर भरधाव वेगाने दुभाजक तोडून या तरुणांच्या गाडीवर येऊन आदळला. या कंटेनरखाली स्कोडा तरुणांची गाडी चेंबली गेली. यामध्ये पाचही तरुण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वरिष्ट पोलीस निरिक्षक विश्वजीत चव्हाण यांनी तात्काळ रुग्णवाहिका व आपत्कालीन मदतीस पाचारणा केली. मात्र, आपत्कालीन मदत मिळण्यापूर्वीच पाचपैकी चार तरुणांनी आपले प्राण सोडले होते. गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाला कारचा पत्रा कापून गाडीबाहेर काढण्यात आले.

दरम्यान, क्रेनच्या साहाय्याने कंटेनरला हटवण्यात आले आणि मृत तरुणांना गाडीतून बाहेर काढले गेेले. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत कंटेनरचा चालक आणि क्लीनर तिथून फरार झाले होते. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

मनसेच्या दहीहंडीला 100 टक्के नाचायला येणार – प्रविण तरडे

“देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे कैवारी आहेत”

राज्यांना ‘इतक्या’ कोटी लसींचे डोस दिले; केंद्र सरकारने जाहीर केली आकडेवारी

चीनमध्ये आढळला आणखी एक नवा व्हायरस; एका रूग्णाच्या मृत्यूने खळबळ

“वाह, काय प्लॅन होता… त्याला पॉर्न इंडस्ट्रीचा राजा बनायचं होतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More