देहरादून | हरिद्वार जिल्ह्यात एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली. रेल्वे ट्रायलदरम्यान ट्रेनखाली चिरडून चार जणांचा मृत्यू झाला.
ट्रायलसाठी चालवण्यात आलेली गाडी 100 ते120 किलोमीटर प्रतीतासाच्या वेगाने धावत होती तेव्हा रेल्वेरुळावरुन जात असलेले हे चार जण गाडीखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सेंथिल अवूदई कृष्ण राज एस यांनी याबाबतची माहिती दिली. मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.
हरिद्वार-लक्सर दरम्यान डबल रेल्वे लाईन टाकण्यात आली आहे. यावर जलद वेगात रेल्वे चालवून लाईनचं परिक्षण केलं जात होतं. त्यासाठी दिल्लीहून रेल्वे गाडी आणण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
थोडक्यात बातम्या-
नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, 2 बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार
राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे- राजेश टोपे
ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब आहे- देवेंद्र फडणवीस
मला महिलांच शरीर आवडतं, पण डोकं नाही- राम गोपाल वर्मा
नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!