बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळं कुटुंब उद्ध्वस्त; आजी-आजोबा, वडिलांनंतर उच्चशिक्षित मुलाचा मृत्यू

मुंंबई | कोरोनाचा वाढता प्रभाव सध्या संपूर्ण देशात पहायला मिळत आहे. कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे कुटुंबच्या कुटुंबं उद्ध्वस्त झाल्याचं समोर येत आहे. चिपळूण पिंपळी गजमल येथील चव्हाण कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मारूती चव्हाण त्यांचे आई-वडील आणि एक तरूण मुलगा यांना कोरोनाने आपलं शिकार केलं आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मारुती चव्हाण यांचे वडील म्हणजे बाळू चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांची आई आणि मग स्वत: मारुती चव्हाण असे तिघेजण पॉझिटिव्ह असताना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दिवसेंदिवस त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही मात्र प्रकृती खराब झाली आणि एकामागोमाग तिघांचाही मृत्यु झाला.

घरातील तिघांचा कोरोनाने मृत्यु झाला होता त्यानंतर मारुती चव्हाण यांच्या मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला उपचारासाठी मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र 1 जूनला त्याचाही कोरोनाने मृत्यु झाला. रत्नागिरी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते आहे. चिपळूण तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असून कोरोना रुग्ण सापडण्याच्या तसेच कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या यादीत चिपळूण तालुक्याचा जिल्ह्यात दुसरा नंबर आहे.

दरम्यान, मारती चव्हाण हे कर्नाटकचे होते. व्यवसायाच्या निमित्ताने ते रत्नागिरीत आले होते. छोटी-मोठी कामं करून त्यांनी कुुटुंब चालवलं. त्यानंतर ते चिपळूणमध्ये शिफ्ट होऊन खासगी आणि शासकीय बांधकामं करू लागले होते. हसत्या खेळत्या कुटुंबात कोरोनाचा आला आणि संपुर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं.

थोडक्यात बातम्या- 

कॅन्सर पीडित किरण खेर यांचा पहिला व्हिडीओ आला समोर, म्हणाल्या….

…अन् अचानक पानघोड्याने पाण्यात सुरू केला बोटीचा थरारक पाठलाग; पाहा व्हिडीओ

“ठाकरे सरकारची जत्रा, त्यात कारभारी सतरा”; महाराष्ट्र सरकार टीकेच्या केंद्रस्थानी

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 95 टक्क्यांवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More