बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा राजकीय धमाका करणार आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत अनेक दिग्गजांनी हातातील घड्याळ सोडत इतर पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूकीत बाजीचं पलटवली. त्यामुळे आता अनेकजण पक्षात परत येताना दिसत आहेत. सरकार आल्यानंतर आता पक्षातील इनकमिंग वाढल्याचं दिसत आहे.

अकोले तालूक्यातील ज्येष्ठ नेते मधूकरराव पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव हे पवार कुटूंबीयांसोबत निष्ठावान होते. परंतु पक्षावरील तेव्हाची वेळ पाहता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, डाॅ. किरण लहामटे यांनी पिचड यांचा धक्कादायक पराभव केला. या पराभवासाठी सर्वच नेते एकत्र आले होते.

उद्या अजित पवार यांच्या उपस्थितीत मुबंईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यावेळी अकोलेचे आमदार डाॅ. लहामटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह अकोलेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, अगस्ती कारखान्याची निवडणूक आगामी काळात होणार आहे. ही निवडणूक गायकर यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याची राष्ट्रवादीची रणनीती असल्याचं समजतं आहे. हा कारखाना पिचड यांच्या ताब्यात आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी; आरोग्यमंत्री कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत!

रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ; अंमली पदार्थ विरोधी पथकाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

सपना चौधरीच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

“मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे”

दोन मुलांच्या बापाने केलं असं काही की कोर्टाने सुनावली 212 वर्षांची शिक्षा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More