धक्कादायक!!! 4 वर्षाच्या मुलाकडून वर्गमैत्रिणीचं लैंगिक शोषण

नवी दिल्ली | अवघ्या 4 वर्षाच्या मुलानं आपल्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीचं लैंगिक शोषण केलंय. राजधानी दिल्लीतील द्वारकातल्या एका बड्या शाळेत हा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडालीय. 

पीडित मुलीनं घरी गेल्यानंतर आपल्या आईला आपबीती सांगितली. मुलानं आपली पँट उतरवून आपल्या गुप्तांगासोबत छेडछाड केल्याचं या मुलीचं म्हणणं आहे. 

दरम्यान, शाळा प्रशासनाने याप्रकरणी दाद दिली नाही म्हणून पालकांनी पोलिसात तक्रार दिलीय. वैद्यकीय अहवालातही मुलीच्या गुप्तांगावर जखमा आढळल्यात. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणी बाल कल्याण समितीचा सल्ला घेत आहेत.