महाराष्ट्र मुंबई

आईसह चार वर्षाच्या चिमुरडीचा गळा चिरुन हत्या

मुंबई | धारावी परिसरातील शाहू नगरमधील डायमंड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेचा आणि तिच्या 4 वर्षांच्या मुलीचा गळा चिरुन हत्या केल्याची घटना काल उघडकीस आली. खून केल्यानंतर त्यांचा मृतदेहदेखील जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

धारावीतील डायमंड अपार्टमेंटमध्ये रियाज हुसेन सय्यद हे पत्नी तेहसीन आणि मुलगी आलिया यांच्यासोबत राहत होते. काल सकाळी दोन्ही मायलेकींची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

घरातून धूर येत असल्याचं शेजारांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना बोलावले, आता हे खून कोणी व का केले? याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, हत्येमागे तेहसीनचा पती रियाजचा कट असू शकतो असा पोलिसांचा अंदाज आहे. शाहू नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शेतकऱ्यांपाठोपाठ असंघटीत कामगारांना खूश करण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

-सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6 हजार रुपये

-भाजपने कंबरतोड महागाईची कंबरच मोडली- अर्थमंत्री पियुष गोयल

-पुण्यात स्वत:च्या 3 मुलींवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप, आईलाही शिक्षा

-ठाकरे कसे आहेत हे कळल्यावर लोक अंगावर कपडे ठेवणार नाहीत- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या