नाशिक | देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राजस्थानातील उदयपुर येथे पक्षाचे चिंतन शिबिर पार पडलं. काँग्रसचे नुकतेच शिर्डी येथे नवसंकल्प शिबिर संपन्न झालं आहे. त्यातच आता काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची सद्यस्थिती आणि पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
चार वर्षे झाली राहुल गांधी यांची भेटण्यासाठी वेळ मिळाली नाही. ज्यावेळेस मी दिल्लीत असतो तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांची भेट होते. मात्र मनमोहन सिंग यांची प्रकृती पहिल्यासारखी बरी नाही. ज्यावेळेस वेळ मागितला तेव्हा सोनिया गांधींची भेट झाली. पक्षनेतृत्व नेत्यांना भेटण्यासाठी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत, असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षासमोरील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी चिंतन शिबिराचं आयोजन केलं होतं. परंतु, राजाशी कोण अधिक निष्ठावान आहे. हे स्पष्ट झालं की, चिंतन किंवा आत्मपरिक्षण करण्याची गरज नाही, असा खोचक टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला आहे.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे. गेल्या आठ वर्षामध्ये देशातील अर्थव्यवस्थेचं दिवाळ निघालं आहे. पेट्रोल आणि डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे. देशात बेरोजगारीचा दर उच्चांकी आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणं घेण नाही. देशात प्रचंड धार्मिक ध्रुवीकरण होत आहे, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाणांनी केला.
थोडक्यात बातम्या-
विधान परिषदेच्या उमेदवारी संदर्भात पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
“मी आता वयाच्या 85 व्या वर्षात आंदोलन करायचं का?”
काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर जोरदार टीका; म्हणाले…
महाविकास आघाडीत नाराजीचा सूर; ‘या’ नेत्याचे शिवसेनेवर गंभीर आरोप
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.