बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात चौथी लाट येणार?, इस्त्रायलच्या नव्या व्हेरियंटने जगाचं टेन्शन वाढलं

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना साथीने हाहाकार माजवला आहे. जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनाच्या लाटा येत आहे. त्यातच आता काही देशांमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. इस्त्रायलमध्ये सापडलेल्या कोरोना व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे.

भारतात नुकतीच कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे अनेक रूग्ण देशभरात सापडत होते. त्य़ातच इस्त्रायलमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सबव्हेरिएंट B.A.1 आणि  B.A.2 पासून नवा व्हेरिएंट तयार झाला आहे.  कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे डेल्टाक्रॉन आढळला आहे. एकीकडे चीनमध्ये कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे इस्त्रायलने कोरोनाच्या नवीन प्रकार आढळल्याची माहिती दिली आहे.

बुधवारी इस्त्रायलमध्ये कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळून आले आहेत. कोरोनाच्या नवीन प्रकारावरून जगभरातील तज्ज्ञांकडून कोणत्याही प्रतिक्रिया आल्या नाहीत. कोरोनाचे व्हेरिएंट सतत बदलत आहेत. त्यामुळे ठोस उपाय शोधणं कठीण जात आहे. जगभरात उपलब्ध असणाऱ्या लसी नव्या कोरोना व्हेरिएंटवर किती प्रभावी आहेत, हे काही आठवड्यात समोर येण्याची शक्यता आहे. इस्त्रायलच्या नवा व्हेरियंट भारतात चौथी लाट येण्याची भीती देखील वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेले इस्त्रायलचे नागरिक बेन गुरियन विमानतळावर आले होते. या रूग्णांमध्ये ताप, डोकेदुखी आणि इतर काही सौम्य लक्षणे आढळून आली. मात्र, या रूग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची आवश्यकता भासली नाही. इस्त्रायलमधील कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगाने पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“नारायण राणे आणि नितेश राणेंचा राजकीय इन्शुरन्स संपलाय, आता…”

“आम्ही पुन्हा 5 वर्ष सत्तेत राहू, भाजपच्या दंडात ताकद असेल तर…”

ममता बॅनर्जींचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ

“पवार साहेब, आमची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा”

मुकेश अंबानींचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More