Top News देश

‘देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार कोरोनाची मोफत लस’; या केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजपने कोरोनाची लस देणार असल्याची घोषणा केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. अशातच केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

देशातील सर्व जनतेला कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणारी लस मोफत मिळेल, असं केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी जाहीर केलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या लशीकरणारवर सरकार 500 रुपये खर्च करणार असल्याचं प्रताप सारंगी यांनी म्हटलं आहे.

सर्व जनतेला करोनावरील लस मोफत दिली जाईल, असं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं असल्याचं सारंगी यांनी सांगितलं.

दरम्यान, प्रताप सारंगी हे पशुसंवर्धन, डेअरी, मासळी खात्याचे राज्यमंत्री आहेत.  मोदींनी 20 आक्टोंबरला देशाला संबोधित करताना भारतीय शास्त्रज्ञ वेगवेगळ्या लशी बनवत असून वेगवेगळया टप्प्यांवर असल्याचं सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमधून बाहेर, साक्षी धोनीने लिहिली भावनिक पोस्ट

काळजी करु नका अजित पवार अगदी ठणठणीत आहेत, लवकरच जनसेवेत हजर होतील- अमोल मिटकरी

”सावरकरांचा पुळका’ असल्याचं दाखवणारे त्यांना भारतरत्न का देत नाहीत?’; राऊतांचा भाजपला सवाल

…यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?- कंगणा राणावत

“एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या