Top News देश

गरिबांना तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप होणार- निर्मला सीतारामन

Loading...

नवी दिल्ली | देशभरातील लॉकडाऊनमुळे गरिब जनतेचे हाल होत असल्याने त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने 1. 70 कोटी रुपयांच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत पॅकेजची घोषणा केली आहे.

देशातील 80 कोटी गरीब जनतेला पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त पाच किलो गहू किंवा तांदूळ तसेच 1 किलो डाळ मोफत मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.

Loading...

देशातील 80 कोटी गरिब जनतेला जी देशाच्या दोन तृतीयांश आहे. त्यांना सध्या प्रत्येक व्यक्तीसाठी 5 किलो गहू किंवा तांदूळ मिळतो आहे. यामध्ये आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त 5 किलो गहू किंवा तांदूळ तसेच 1 किलो डाळ यांचे मोफत वाटप केले जाणार आहे.

दरम्यान, विविध राज्यांमधून ज्या प्रकारे डाळीबाबत मागणी असेल तिथेच मोफत डाळीचे वाटप केले जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका- अजित पवार

जनतेला धान्याऐवजी थेट पीठ देणार- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या-

घरात येणाऱ्या माशांपासूनही कोरोना होऊ शकतो- अमिताभ बच्चन

गोरगरीबांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ‘इतक्या’ हजार कोटींची घोषणा

धक्कादायक! पोलिसांकडूनच पोलिसाला आणि त्याच्या मुलीला बेदम मारहाण

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या