बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोफत लसीकरणाने महाराष्ट्राच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा

मुंबई | देशभरात कोरोनाने थैमान घातला असून त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेला वेग येताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात देशभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असल्याने महाराष्ट्रात लसीकरण मोहीमही सर्वाधिक प्रमाणात सुरू आहे. त्यातच 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्याच केंद्र सरकारने घोषित केल.

महाराष्ट्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांनाच मोफत कोरोना लस देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून नुकतच घोषित केलं आहे. पण आधीच आर्थिक डबघाईला आलेली महाराष्ट्र सरकारची तिजोरी मोफत लसीकरणामुळे आणखी अडचणीत येण्याची चिन्हे सध्या दिसून येत आहेत.

कोविशिल्ड ही लस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तर्फे केंद्र सरकारला 150 रुपयांना तर राज्य सरकारांना 400 रुपये प्रति डोस प्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. त्याबरोबरच खाजगी रुग्णालयांना देखील हा डोस 600 रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे. पण मोफत लस देत असताना राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडणार असून आर्थिक भाराचा सरकारला मोठा सामना करावा लागणार आहे.

एकीकडे लसीकरण मोहीम 1 मे पासून सुरू होणार असली तरी महाविकास आघाडी सरकारमध्ये श्रेय वादाचं राजकारण होत असताना पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेते यामुळे नाराज असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आपल्या निर्णयावर कायम राहणार कि, काही दिवसांनंतर मोफत लस देण्याचा निर्णय मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोनामुळे कलाकारांवरही वाईट वेळ, तारक मेहता फेम नट्टू काकांची परिस्थिती गंभीर

“नवाब मलिक यांना हटवून, परभणीला पूर्णवेळ देणारा, कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या”

‘या’ ठिकाणावरून 318 ऑक्सिजन काॅंन्स्नट्रेटर घेऊन निघालं विमान; अवघ्या काही तासांत भारतात येणार 

नोकरीला नसून देखील 15 वर्षांपासून बँकेत जमा व्हायचा पगार, मोठं रहस्य आलं समोर

“भारतात कोरोना मृतांची संख्या लपवली जात आहे, खरा आकडा 4 ते 5 पट अधिक”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More