Big Announcement l केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील गरीब जनतेला यापुढे तब्बल चार वर्षापर्यंत मोफत धान्य मिळत राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मोफत धान्य वितरणाची मुदत 4 वर्षांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
2028 पर्यंत गरिबांना मोफत धान्य देणार :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. केंद्र सरकार नव्या नियमानुसार आता 2028 पर्यंत गरिबांना मोफत धान्य देणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने 17,082 कोटी रुपये खर्चाची मंजुरी दिली आहे.
याशिवाय ॲनिमिया आणि पौष्टिक कमतरता दूर करण्यासाठी या योजनेला मंजुरी दिली आहे. तसेच या योजनेंतर्गत फोर्टिफाइड राईसला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच या योजनेचा संपूर्ण खर्च हा केंद्र सरकार उचलणार आहे.
Big Announcement l योजनेचा खर्च केंद्र सरकार उचलणार :
गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारने अनेक योजनांना हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै 2024 ते डिसेंबर 2028 या कालावधीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना तसेच इतर कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत मोफत तांदळाचा पुरवठा सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या उपक्रमाचा उद्देश हा विकास आणि पोषणाला चालना देणे असा आहे. तसेच ते म्हणाले की त्याचा संपूर्ण खर्च सुमारे 17,082 कोटी रुपये असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकार या योजनेचा संपूर्ण खर्च उचलणार आहे.
News Title : free ration will be available for the next four years
महत्वाच्या बातम्या –
आता तुम्ही सगळे पडणार, मनोज जरांगेंच खळबळजनक वक्तव्य
आज रंगणार भारत विरुद्ध बांगलादेश; कुठे व किती वाजता पाहता येणार
शनीचा राहुच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ 3 राशींच्या आर्थिक अडचणी वाढणार!
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबतं?, रविकांत तुपकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
भन्नाट फीचर्ससह BYD eMax 7 कार लाँच; जाणून घ्या किंमत