बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार होणार’; राजेश टोपेंची मोठी घोषणा

मुंबई | आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या आजारात लागणाऱ्या सर्व औषधांचा खर्चही या योजनेतून दिला जाणार असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

म्युकरमायकोसिसमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. त्यामुळे या योजनेत काहीसा बदल करुन म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी जाहीर केलंय.

म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे दीड हजार रुग्ण आढळून आले आहेत. 500 जण या आजारातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या पाहता 2 लाख एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सची गरज असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना लसीकरण नियमात मोठे बदल; वाचा सरकारने जारी केलेले नवे नियम

‘पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा’; खासदार प्रीतम मुंडेंचं मोदींना पत्र

“सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही”

“मोदी गुजरात दौऱ्यावर तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा”

3 वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची विहिरीत उडी; बुलडाण्यातील मायलेकीच्या आत्महत्येने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More