खूशखबर… पुणेकरांना आजपासून मिळणार मोफत वायफाय!

पुणे | पुणेकरांना आजपासून चक्क मोफत वायफायचा आनंद घेता येणार आहे. स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या माध्यमातून शहरातील तब्बल 150 ठिकाणी मोफत वायफाय मिळणार आहे. 

शहरातील काही उद्याने, सरकारी कार्यालये, दवाखाने, पोलीस स्टेशन्स, संग्रहालये तसेच महापालिकेची इमारत अशा ठिकाणी या सेवेचा पुणेकरांना लाभ घेता येणार आहे. 

सुरक्षिततेसाठी काही वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. तर मोबाईलसोबत लॅपटॉवरही हे फ्री वायफाय वापरता येणार आहे. 

कसं वापरणार फ्री वायफाय?

-मोबाईलमधील वायफाय ऑन करा

-आलेल्या वायफायपैकी ‘पुणे वायफाय’ निवडा

-तुमचा फोन क्रमांक टाका रिसिव्ह ओटीपी म्हणा

-मेसेजद्वारे मिळालेला ओटीपी टाकून कनेक्ट म्हणा