बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झालं”; ‘ग्लोबल फ्रिडम’चा अहवाल

नवी दिल्ली | स्वातंत्र्याच्या मानांकनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे मानांकन 71 वरून घसरुन 67 करण्यात आले आहे. जागतिक पातळीवरील 211 देशांपैकी भारताचा क्रमांक 88 वा लागतो. यापूर्वी भारत 83 व्या क्रमांकावर होता.

2014 ला नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून भारताचं स्वातंत्र्य नष्ट होत असल्याचं फ्रीडम हाऊसने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. तसेच पूर्णतः स्वतंत्र देशावरून आता भारत अंशतः स्वतंत्र देशावर खाली आला आहे.

जागतिक पातळीवर नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे देश 100 पैकी 100 गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहेत. तसेच या यादीत सर्वात खाली तिबेट आणि सिरियाचा समावेश करण्यात आला आहे. फ्रीडम हाऊस दरवेळी आपल्या अहवालात काश्मीरचा उल्लेख भारतापेक्षा वेगळा करते. यावेळी काश्मीरला स्वातंत्र्यच नाही असं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.

2013 ते 2019 या काळात काश्मीर हा  भाग अंशतः स्वतंत्र या प्रवर्गात येत होता. देशद्रोहाच्या कायद्याचा वापर, मुस्लिम अत्याचार आणि कोरोनासारखी परिस्थिती हाताळताना उचललेले पाऊल या पार्श्वभूमीवर भारताचे मानांकन कमी करण्यात आल्याचं फ्रीडम हाऊसच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

धक्कादायक!! औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये महिलेसोबत घडला ‘हा’ प्रकार

6,6,6,6,6,6…! युवराजचा रेकाॅर्ड ‘या’ खेळाडूने मोडला, पाहा व्हिडिओ

इंदौरच्या अकोलेकरांच्या सुनेवर ‘या’ फोटोमुळे सोशल मीडियातून होतोय कौतुकाचा वर्षाव!

‘संजय राठोड अजुनही मंत्रीपदावरच’; चित्रा वाघ यांचा सरकारवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More